पानठेला व्यवसाय पुर्ववत सुरू करा!


पानठेला व्यवसाय पुर्ववत सुरू करा!
बल्लारपुर बामणी पानठेला असोसिएशन ची मागणी 
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर): संपूर्ण जगात कोरोना कोव्हीड १९ या  विषाणू चा हा हा कार सुरू असल्याने देशात  व राज्यांत लागडाऊण जारी करण्यात आला.मागील ३ महिन्यापासून पानठेला व्यवसाय बंद झाल्याने पानठेला व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आल्याने  पानठेला व्यवसाय पुर्ववत सुरू करा अश्या विविध मागण्यांचे निवेदन बल्लारपुर तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना बल्लारपुर बामणी पानठेला असोसिएशन ने दिले.
     त्यात सरकारी कार्यालये,कारखाने,व्यवसाय बंद करण्यात आले.   व घरी राहा सुरक्षित रहा असा संपुर्ण देशाला मंत्र दिला. यात सर्वच कार्यालये,कारखाने,व्यवसाय बंद होते. व सर्व नागरिकांनी या लागडाऊण चे काटेकोर पालन करुन सहकार्य केले.  देशाची आर्थिक स्थिती ढासळू नये म्हणून संपूर्ण देशात लागडाऊण शिथील करून प्रधानमंत्री यांनी १,२,३,४ लागडाऊण  समाप्त करून जवळ जवळ संपूर्ण कारखाने,कार्यालये,व्यवसाय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. अनलाॅक १ मध्ये बरेच व्यवसाय सुरू झाले मात्र पानठेला व्यवसायाला अद्याप सुरू  करण्याची परवानगी देण्यात आलेली  नाही. त्यामुळे पानठेला व्यावसायीक प्रचंड अडचणीत सापडले आहे.बल्लारपुर बामणी शहरात जवळपास ५०० ते ६०० पानठेला धारक असुन त्यांच्यावर अवलंबून असलेले १५०० ते १६०० परीवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असे आवाहन पानठेला व्यावसायीकांवर समोर उभा असल्याने पानठेला व्यवसाय पुर्ववत सुरू करा किंवा परीवाराला शासना कडुन पॅकेज जाहीर करून दरमाहा १०,०००/ रूपये अनुदान जाहीर करावे व पानठेला व्यावसायीकांना फेरीवाले मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी बल्लारपुर  बामणी पानठेला असोसिएशन चे अध्यक्ष अरुण भटारकर,सचिव सुजय वाघमारे,उपाध्यक्ष अनिल टपाले,कार्याध्यक्ष अनिल निवलकर,सहसचिव अनिल गुरनुले,कोषाध्यक्ष देशपाल सौदागर,व सर्व सभासदांनी केली.

Post a Comment

0 Comments