पोलीस निरीक्षक पवार यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार


पोलीस निरीक्षक पवार यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार


भद्रावती,दि.12(राज्य रिपोर्टर) :  संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस,डाॅक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.याच उदात्त भावनेतून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांचा नुकताच पोलिस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला.
     पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेचे अध्यक्ष ईश्वर शर्मा यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पोलिस निरीक्षक पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका शाखेचे पदाधिकारी अशोक पोतदार,वतन लोणे,जावेद शेख,उमेश कांबळे,रुपचंद धारणे,श्याम चटपल्लीवार,पवन शिवनकर आणि महेश निमसटकर उपस्थित होते.
     भद्रावती तालुका मराठी पत्रकार संघाने सत्कार 
 केल्याबद्दल पोलिस निरीक्षक पवार यांनी पत्रकार संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच पत्रकारांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments