यवतमाळ दारव्हामध्ये 11 जण पॉझेटिव्ह



यवतमाळ दारव्हामध्ये 11 जण पॉझेटिव्ह 

यवतमाळ,(राज्य रिपोर्टर) गत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नेर आणि दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत आहे. काल रात्री दारव्हातील 11 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले असून हे सर्व जण सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क्‍ काँटॅक्टमधील) आहे. आता जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 43 झाली असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह 195 झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व मृत्युची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी बाजार किंवा इतरांच्या संपर्कात येणे टाळावे.

Post a Comment

0 Comments