कुख्यात चोर संदीप सोरते याला रामनगर पोलिसांनी केली अटक !
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर शहरात वाढत्या चोरीच्या घटना घडत असतांनाच घरफोड्या करणारे आणि गाडी, टायर व बैटरी चोरी करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे, पण यांवर उपाय म्हणजे पोलिसांनी सुद्धा आरोपींना शिताफीने पकडण्याचे तंत्र अवलंबले आहे. चंद्रपूर अस्टभुजा येथे राहणारा संदीप भगवान सोरते या चोरट्याला ताब्यात घेवून त्याचेकडून जवळपास ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जब्त केला आहे. कुणाच्या घरून किंव्हा दुकानातून गाड्यांसह, बैटर्या चोरी.गाड्यांचे सामान व रेल्वेचे साहित्य चोरी करण्यात अग्रेसर अशा या संदीप सोरतेचा पीसीआर घेवून पुन्हा इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे कां ? याबद्दल माहिती घेवून लवकरच ह्या चोराकडून अनेक चोऱ्याचे उलगडे होणार असल्याची प्रतिक्रिया रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देतांना व्यक्त केली.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दरेकर, उपपोलिस निरीक्षक कापडे, गजू दहिफोडे, चिकाटे व इतरांनी केली .

0 Comments