बल्लारपुरातील तिसरा डोळा गायब : गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाढते प्रस्थ

बल्लारपुरातील तिसरा डोळा गायब : गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाढते प्रस्थ 


बल्लारपुर दिपक भगत:- बल्लारपुर शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते या शहरात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असल्याचे दिसते रोजगाराच्या शोधासाठी देशाच्या अनेक प्रांतातुन नागरिक बल्लारपुर शहरात आल्याचे दिसून येते चंद्रपुर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणूनही बल्लारपुर शहराची ओळख आहे याशिवाय उच्च प्रतिच्या दर्जेदार अशा सागवान लाकडाचे मोठे एक केन्द्रही या शहराला लाभले आहे 12 माही वाहनारी वर्धा नदी व तिच्यावर विस्मबुन असणारे पेपर उद्योग व कोळशाच्या खानी आहे असा हा विविध प्रकारच्या साधन समृद्धिने नटलेला आहे.
        बल्लारपुर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे हेवीवेट नेते व माजी वित्त वन व नियोजन मंत्री मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा मतदार संघ म्हणून बल्लारपुर मतदार संघाची ओळख संपूर्ण राज्याला आहे शिवाय गोंड़ राजाचा इतिहासाचा वारसाही या शहराला लाभला आहे व यामुळे मागील सरकारच्या काळात बल्लारपुर मतदार संघाचा विशेषतः बल्लारपुर शहराच्या विकासाकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष दिले गेले या अंतर्गत महाराष्ट्रातील दूसरी सैनिकी शाळा बल्लारपुर लगत स्थापन झाली, बोटनिकल गार्डन, खेळाच्या सोईसाठी प्रशस्त स्टेडियम, शहरात निर्माण झालेली विविध शासकीय कार्यालये, बसस्थानक निर्मिती अशी विविध विकासकामे करण्यात आली होती याशिवाय मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या आमदार निधितुन बल्लारपुर शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले होते व नियंत्रण बल्लारपुर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात येत होते मात्र बल्लारपुर पोलिस स्थानकाच्या निर्मितिच्या कारणामुळे ते बंद होते व यामुळे अनेक ठिकानचे सीसीटीव्ही गायब झाले आहे.
            बल्लारपुरात सुसज्ज अशा पोलिस स्थानकाची निर्मिती होवून वर्षभराचा काळ लोटत असताना सुध्दा सीसीटीव्ही पूर्ववत लागने अपेक्षित असताना सीसीटीव्ही हे शासनाच्या विविध विभाग(पोलिस विभाग व प्रशासकीय विभाग) यांच्यात अळ कले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवन्याचे कार्य पोलिस विभागाचे असल तरी या सीसीटीव्ही मुळे शहरातील अनेक ठिकानची माहिती सहजरित्या मिळत होती.
              बल्लारपुर शहरात सीसीटीव्ही कैमराच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वाहनधारकाच्या बेशिस्त पनामुळे नवीन बसस्थानक परिसरात केव्हा अपघात घडेल सांगता येत नाही शिवाय अवैध दारू, शहरात वाढनारी गुन्हेगारी प्रवृत्ति यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरीता पोलिस विभागासोबतच सीसीटीव्ही ची सुद्धा अत्यंत गरज आहे व शासनाच्या विभागाने आपसात समन्वय साधुन लवकरच सीसीटीव्ही लावतील अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments