16 ते 17 मार्चला पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार
चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर, दि. 14 मार्च : महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग मंत्री, खार जमीन विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे 15 ते 18 मार्च 2020 या दरम्यान नागपूर, चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
16 मार्च 2020 रोजी सकाळी 08.15 वाजता कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण व सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे आगमन होईल. सकाळी 10.25 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन व त्यानंतर सकाळी 10.30 वाजता कोरोना विषाणू व त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत अधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेणार आहेत. 11 वाजता चांदा ते बांदा योजनेबाबात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहे. 11.15 वाजता मसाळ तु सिनाळ, भटाळी व नवेगाव पुनर्वसन करणे, भुसंपादन मोबदला व प्रदुषण विषयक समस्याबाबत आढावा बैठक नियोजन भवन, चंद्रपूर येथे घेतील.
दिनांक 17 मार्च 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून सावली कडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता तहसील कार्यालय, सावली येथे आगमन व विकास कामाची आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यत गोसीखुर्द शासकीय विश्रामगृह, सावली येथे राखीव असून दुपारी 2.15 वाजता गोसीखुर्द शासकीय विश्रामगृह सावली येथून व्याहाड खुर्द सावली कडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता पालकमंत्री कार्यालय, व्याहाड खुर्द सावली येथे आगमान व नागरिकासोबत थेट संवाद साधतील. सायंकाळी 5 वाजता व्याहाड खुर्द सावली येथून नागपूरकडे प्रस्थान व मुक्काम करतील
18 मार्च 2020 रोजी सकाळी 6.30 वाजेपर्यत कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर सकाळी 7.55 वाजता नागपूर वरुन मुंबईकडे प्रयाण करतील.



0 Comments