बल्हारशाह पिटलाईन चे काम लवकरच पूर्णत्वास
- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची निर्माण कार्याला भेट
चंद्रपूर:- चंद्रपूर व बल्लारपूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने बल्हारशाह रेल्वे स्थानकात रेल्वे पिटलाईन चे काम मंजूर झाले होते. या कामाच्या पाहणीसाठी त्यांनी रेल्वे स्थानकाला भेट देवून यावेळी कामाच्या प्रगतीबाबत पाहणी करुन काम तातडीने पूर्ण व्हावे याकरीता आवश्यक सुचना दिल्या.यावेळी बल्हारशाह रेल्वे स्थानकाचे प्रबंधक श्री रामलाल यांनी कामाच्या प्रगतीबाबत माहिती देत काम तातडीने पूर्ण होईल असे यावेळी आश्वासीत केले.
बल्लारपूर स्थानकात पिटलाईन निर्माण कार्याच्या पाहणीसाठी पूर्व केंद्रिय गृहराज्यपंत्री हंसराज अहीर यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. चंदनसिंग चंदेल, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री. दामोदर मंत्री, श्री. श्रीनिवास सुंचूवार, चंद्रपूर रेल्वे संघर्ष समिती चे श्री. रमणिकभाई चव्हाण, श्री. अमिष दिक्षित भाजप चे निलेश खरबडे, श्री. संजय मुप्पीडवार, जुम्मन रिझवी, पूनम तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते. बल्हारशाह येथील पिटलाईनचे भविष्यात लवकरच लोकार्पण झाल्यास या परिसरातील रेल्वे प्रवाशांना अनेक नविन गाड्या आणि गाड्यांचे विस्तार मिळून फार मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगत या कार्याचा सातत्याने पाठपूरावा करीत असल्याने हे कार्य लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.

0 Comments