शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना 31 मार्च पर्यंत सुटी - आ.सुधीर मुनगंटीवार
यासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संघटनांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली असता आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याशी चर्चा केली असता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनाच सुटी जाहीर केली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी 31 मार्च पर्यंत शाळेत जावू नये, सुटी सर्वांसाठीच असल्याची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी नोंद घ्यावी असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे



0 Comments