आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते कोडापे परिवाराला १० लाखाच्या धनादेशाचे वितरण.
राजुरा वनविभागाकडून वाघ हल्ल्यातील मृतकाचे परिवारास तातडीने मदत.
राजुरा (ता.प्र) :-- राजुरा तालुक्यातील इंदिरा नगर, राजुरा येथील रहिवासी स्व. मंगेश कोडापे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या प्रकरणी आमदार सुभाष धोटे यांनी वनविभागाचे अधिकारी यांना संपर्क साधून मृतकाचे वारसांना आर्थिक व अन्य मदत तातडीने करण्यात यावी अशा सुचना केल्या होत्या. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी युद्ध स्तरावर काम करून शासनाकडून मृतकाचे परिवारास १० लाख रुपयांची तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे.
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते मंगेश कोडापे यांच्या पत्नी श्रीमती गौरा मंगेश कोडापे यांना आज १०, ००००० रुपये (दहा लक्ष रुपये) धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, साईनाथ बतकमवार माजी कार्याध्यक्ष काँग्रेस कमेटी राजुरा, अमोल घटे, सेवादल सदस्य, उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, आर एफ ओ विदेशकुमार गलगट उपस्थित होते.

0 Comments