कोरोना वायरस च्या प्रभावामुळे देशभरातील प्रार्थनास्थळ व पर्यटन स्थळ बंद

कोरोना वायरस च्या प्रभावामुळे देशभरातील प्रार्थनास्थळ व पर्यटन स्थळ बंद

दिपक भगत/बल्लारपुर :- चीन या देशाच्या वुहान प्रांतात कोरोना या जीवघेण्या वायरस ची सुरुवात झाली व या कोरोना वायरस मुळे चीन मधील हजारो लोक मृत्यु मुखी पडले आहे चीन मधील धूमाकूळ घातल्यानंतर या कोरोना वायरस ने आपले पाय आता जगभरात पसरविन्यास सुरुवात केली आहे. भारतात सुद्धा कोरोना वायरस चा प्रसार होण्यास सुरुवात झाली असून यावर उपाय योजना म्हणून या वायरसची लागण झालेल्या व्यक्तीनी त्वरित उपचार करणे आवश्यक आहे शिवाय याची लागण इतरांना होवू नये याकरिता दक्षता घेणे आवश्यक आहे.
        भारतात अनेक राज्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती असून या वाढत्या कोरोना वायरस चा प्रभाव पाहता देशभरातील अनेक प्रार्थना स्थळ, व पर्यटन स्थळ बंद करण्यात आली आहेत सूत्राच्या माहिती नुसार नवी दिल्ली येथील लाल किल्ला, आग्रा येथील ताजमहल, मुंबई तिल सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी तिल साईबाबा देवस्थान, हैदराबाद येथील कुतुबमीनार यासह देशभरातील अनेक प्रार्थनास्थळ व पर्यटन स्थळ शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे तसेच विविध राज्यात 31 मार्च 2020 पर्यंत शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात मंत्रालयीन कर्मचारी मध्ये कोरोना वायरस चा प्रभाव दिसून आल्यामुळे महाराष्ट्रात शासकीय कर्मचारी वर्गाला 7 दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे तसेच अनेक कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुद्धा बंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments