'त्या' बालकाबाबत संबंधित पालकांनी हक्क दाखवावा अन्यथा
दत्तक मुक्त घोषित करणार : अजय साखरकर
चंद्रपूर, दि. 17 मार्च : 'चिराग' या बालकाचे नाव नोंदवून दिनांक 3 ऑक्टोंबर 2018 च्या आदेशान्वये या नवजात बालकाला महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक संस्था चंद्रपूर येथे दाखल केले होते.
तरी या बालकाबाबत संबंधित पालकांनी आपला हक्क दाखवावा अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अजय साखरकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यालगत अड्याळ टेकडी येथे दिनांक 28 सप्टेंबर 2018 रोजी एका अज्ञात महिलेने मातृत्व लपविण्याकरिता जन्म दिलेल्या पुरुष बालकास उघड्यावर टाकून दिले होते. या रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी, तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांनी नोंदवून या बालकाला उपचाराकरिता पोलिसांनी त्याच दिवशी मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे दाखल केले. बालकाची प्रकृती बरी झाल्यावर दिनांक 3 ऑक्टोंबर 2018 रोजी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित करून सदर बालकाचे नाव 'चिराग' नोंदवून दिनांक 3 ऑक्टोंबर 2018 च्या आदेशान्वये या बालकास महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथे दाखल केले आहे.
या बालकाच्या संबंधित पालकांनी 7 दिवसाच्या आत बालकल्याण समिती, द्वारा शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, डॉ.आल्लूरवार बिल्डींग, सी.18, शास्त्रीनगर, बगीच्या जवळ, शास्त्री नगर, चंद्रपुर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर किंवा महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, डॉ.मुठाळ यांच्या जुना दवाखाना जवळ, रामनगर, चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधून सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा.
या बालकाबाबत संबंधित पालकांनी आपला हक्क दाखविला नाही तर बालकल्याण समिती, चंद्रपूर बालकास दत्तक मुक्त घोषित करणार आहे व यानंतर महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक संस्था, चंद्रपूर ही संस्था बालकाची दत्तक देण्याची प्रक्रियेला सुरुवात करणार याची नोंद संबंधितांनी घ्यावी,असे जाहीर सूचना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अजय साखरकर यांनी दिली आहे.



0 Comments