जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयाशी संबंधित
106 संस्था अवसायानात ; 20 मार्चची सभा रद्द
चंद्रपूर, दि. 17 मार्च : राज्य शासनाच्या जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात पशु, दुग्ध व मत्स्य सहकारी 106 संस्थांची यादी अवसायानात काढण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे.
अवसायानात काढण्यात आलेल्या या संस्थांची 20 मार्च रोजीची अंतिम सभा सकाळी 11 ते 4 या काळात जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, चंद्रपूर प्रशासकीय भवन पहिला मजला चंद्रपूर येथे आयोजित सभा रद्द करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता दिनांक 20 मार्च रोजीची सभा तुर्तास रद्द करण्यात आली आहे. पुढील सभेची तारीख लवकरच कळविण्यात येईल. याची सहकारी संस्थेच्या सभासदांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एन. बी. निंबाळकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकामध्ये सांगितले आहे.



0 Comments