मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे जनतेला आवाहन

अभ्यागतांना काही काम असल्यास ईमेल करा
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे जनतेला आवाहन

चंद्रपूर,दि. 17 मार्च : कोरोना विषाणूचा देशात वाढता प्रभाव पाहताजिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर कडून याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनगावातील जनता आपल्या समस्या घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीला येत असतात अशा अभ्यागतांनी कोरोना विषाणूचा प्रकोप रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा यासाठी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत कुठलीही काम असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला न येता कार्यालयीन ई-मेल आयडी  ‌‌ zillaparishadchandrapur@gmail.com वर आपली समस्या पाठवू शकता.
ईमेल वर येणाऱ्या प्रत्येक तक्रारी व समस्येचे निराकरण करण्यात येईल. तरी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत अभ्यागतांना प्रत्यक्ष भेटीस येण्यापेक्षा ई-मेलद्वारे आपल्या समस्या मांडाव्यात,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments