आज पासून पालकमंत्री विजय वडेट्टीवार नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आज पासून पालकमंत्री विजय वडेट्टीवार
नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर,दि.18 मार्च : महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण विभाग,खार जमिन विकासआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 19 ते 23 मार्च या दरम्यान नागपुर,चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहे.
19 मार्च रोजी सकाळी 8:30  वाजता मुंबईवरून प्रयाण करून सकाळी 10:30 ला कमलाई निवासरामदास पेठ,नागपूर येथे आगमन होऊन मुक्काम करतील.
20 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता नागपुर वरून ब्रह्मपुरी  जिल्हा चंद्रपूरकडे प्रयाण करतील  व दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव असणार आहेत. दुपारी 12.30 वाजता तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय ब्रह्मपुरी येथे चर्चा करणार आहे.
सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोली कडे प्रयाण करतील व सायंकाळी 7:30 वाजता रानफूल निवास,पोटेगाव रोड,गडचिरोली येथे आगमन व मुक्काम करतील.
21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रानफूल निवास पोटेगाव रोडगडचिरोली येथून व्याहाड खुर्द तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय,व्याहाड खुर्द तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे आगमन व राखीव असणार आहेत.
सकाळी 11 वाजता पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय,सावली येथे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ता सोबत चर्चा करणार आहे. सायंकाळी 5 वाजता व्याहाड खुर्दतालुका सावलीजिल्हा चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील व रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदास पेठनागपूर येथे आगमन व मुक्काम करतील.
22  व 23 मार्च रोजी पालकमंत्री नागपूर येथे असुन राखीव असणार आहे.

Post a Comment

0 Comments