रॉयल्टीवर टीसीएस योग्य प्रकारे जमा करा : आकाश गुरु
जिल्हाधिकारी कार्यालय येथे टीसीएस 2 टक्के व
डिएमएफ आकारण्याबाबत कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 14 मार्च : प्राप्तिकर विभाग, चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 2 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयकर अधिकारी आकाश गुरु यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिजावरील स्वामित्वधनावर आकारण्यात येणाऱ्या टीसीएस व डिएमएफ बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. टीडीएस चंद्रपूरचे आयकर अधिकारी आकाश गुरु यांनी रॉयल्टीवर टीसीएस योग्य प्रकारे जमा करावे असे प्रतिपादन यावेळी केले.
या कार्यशाळेमध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी जी.डी.कांबळे तसेच उपविभागीय व तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेत गौण खनिजावरील टीसीएस 2% कर दर करण्याच्या तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्राप्तिकर कायद्यानुसार, टीसीएस 2% राज्य सरकारच्या कार्यालयांद्वारे गोळा केलेल्या रॉयल्टीवर शुल्क आकारले जाते. नियमानुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, राज्य सरकारच्या उपविभागीय कार्यालयांकडून विविध खनिजांवर रॉयल्टी गोळा केली जाते. तथापि, रॉयल्टीवर केंद्र सरकारला देय असलेले टीसीएस गोळा केले जात नाहीत. या विषयावर कार्यशाळेत प्राथमिक चर्चा झाली.
आयकर अधिकारी आकाश गुरु यांनी मार्गदर्शनात टीडीएस, टीसीएसच्या विविध तरतुदींचे स्पष्टीकरण आयकर कायद्यानुसार दिले. टीडीएस, टीसीएस रिटर्न भरण्याच्या तारखा, "टिआरएसीइएस" सॉफ्टवेअरचा वापर याविषयी माहिती दिली तसेच कर न कपात केल्यास व्याजदंड आकारला जातो. यावेळी उपस्थितांनी विविध प्रश्न मांडून आपल्या प्रश्नांचे निराकरण या कार्यशाळेच्या माध्यमातून केले.



0 Comments