आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थीचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न   

चंद्रपूर, दिनांक 13 मार्च :  शुक्रवारी आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे ३/२०१९-२० या सत्रातील प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु.भाग्यश्री वाघमारे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हया उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून साजन शेंडे, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी चंद्रपुर तर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी  प्रविण टाके हे उपस्थित होते तसेच प्रशिक्षण केंद्राचे कनिष्ठ कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, विजय गराटे यांचेसह प्राध्यापक वर्ग सी.डी. परीहार, शाताराम मडावी व संजय श्रीरामे हे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन उपस्थित पाहुण्यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाचा शुभारंभ केला. उप प्रादेशिक परीवहन अधिकारी साजन शेंडे यांनी मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना प्रशिक्षणार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आलेल्या संधीचा लाभ घेऊन, वेळेचे नियोजन करावे आणि कुठल्याही परीस्थितीचे कारण न देता सतत प्रयत्न करावे यामुळे नक्कीच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही असे मोलाचे मार्गदर्शन केलेत. तसेच स्वतःचे अनुभव सांगतांना ग्रामिण भागातून आलेले उमेदवार असून स्वतः सधन परिस्थीतीचा बाऊ न करता स्वतःच्या बळावर कार्यरत असल्याचे सांगीतले.
तसेच प्रविण टाके, जिल्हा माहिती अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उमेदवारांना
सातत्याने प्रयत्न करुन प्रत्येकाने त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य ओळखुन पुढे वाटचाल करणेसाठी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी उपस्थिती पाहुण्यांनीसुध्दा प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलेत.
या प्रसंगी उपस्थिती प्रशिक्षणार्थ्यामध्ये रघुनाथ लाकाडे, रोहन गेडाम, प्रफुल टेकाम,शितल जांभळे यांनी मनोगत व्यक्त केलेत तर सतिश आत्राम, अमोल गेडाम, शितल जांभुळे, श्रध्दा नन्नावरे, स्वाती नन्नावरे यांनी गीत गाऊन पाहण्यांचे मने जिंकलीत. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी सांस्क्रूतीक कार्यक्रम आयोजन करुन बलून स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चमचा गोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, संमुह नृत्य
स्पर्धा, मेनबत्ती स्पर्धा इ. स्पर्धाचे आयोजन केलेत. सर्व स्पर्धाकांना प्रोत्साहनपर बक्षीसांचे वितरण करण्यांत आले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षणार्थी विशाल पेन्दोर यांनी केलेत तर प्रास्ताविक प्रफूल टेकाम
यांनी केले. शेवटी शितल जांभुळे या प्रशिक्षणार्थीने सर्वांचे तथा प्रशिक्षण केंद्राचे आभार माणून कार्यक्रम संपल्यांचे जाहीर केलेत. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आयोजन केलेल्या भोजणाचा स्वादसुध्दा घेण्यात आला. कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता सर्व प्रशिक्षणार्थीनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments