मध्यप्रदेशातील शिवनी जाणाऱ्या 80 मजूराना बल्लारपुर येथील रैन बसेरा येथे आश्रय

मध्यप्रदेशातील शिवनी जाणाऱ्या 80 मजूराना बल्लारपुर येथील रैन बसेरा येथे आश्रय

दिपक भगत/बल्लारपुर :- गड़चांदुर येथील पांढरपवनी मध्ये कापूस जिनिग मध्ये कार्यरत असणाऱ्या मध्यप्रदेशातिल 80 मजूराना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परत जाण्याचे वेध लागले .
असता सर्व मंजूर गड़चांदुर येथून पायी चालत सास्ती रामपुर मार्गाने बल्लारपुर शहरात दाखल झाले असता बल्लारपुर येथील बल्लारपुर कॉलरी परिसरातील दुर्गा माता मंदिर जवळ असल्याची माहिती मिळाली असता पोलिस प्रशासन, 
तहसील कार्यालय व नगर परिषद बल्लारपुर च्या वतीने त्यांच्या राहण्याची सोय  बल्लारपुर शहरातील बचत भवन, संत तुकाराम महाराज सभागृह या ठिकाणी करण्यात आली .
असून ततपुर्वी या सर्व मजूरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यांच्या भोजनाची सोय नगर परिषद बल्लारपुर व शहरातील सामाजिक संघटना यांच्या माध्यमातुन करण्यात आली आहे सद्यास्थितित बल्लारपुर शहरात रैन बसेरा (शेल्टर होम) मध्ये देशाच्या विविध भागातील वास्तव्यास असलेल्या 120 ते 130 नागरिकांच्या राहण्याची सोय करण्यात आली.
 असून या सर्वांच्या भोजन व निवासाची सोय नगर परिषद बल्लारपुर तर्फे करण्यात आली आहे तसेच या सर्व निर्वासिताना विविध प्रकारची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विपिन मुद्दा, पोलिस निरीक्षक श्री शिवलाल भगत व तहसीलदार साहेब बल्लारपुर यांनी केली आहे.

Post a Comment

2 Comments