नगर परिषद बल्लारपुरचा अजुन एक सेवाभावी उपक्रम
रैन बसेरा : हरीश शर्मा न.प.बल्लारपूर अध्यक्ष
रैन बसेरा : हरीश शर्मा न.प.बल्लारपूर अध्यक्ष
बल्लारपूर : दि २८/०३/२०२० रोजी बल्लारपूर शहर येथे न.प. बचत भवनात येथे रैन बसेरा सुरू करण्यात आले. देशातच नव्हेतर जगात थैमान घातलेल्या कोरोना विषानुचा संसर्गाची चैन तोडण्याकरिता शासनाच्या कर्फ्यु बंद च्या दरम्यान बाहेरील गावाचे नागरिक जे बल्लारपुर शहरात अडुन पडले आहे.
असे व बल्लारपुरातील अस्थायी नागरिकांसाठी बल्लारपुर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात व मुख्याधिकारी विपिन मुध्दा यांच्या नियोजनांतर्गत रैन बसेरा शेल्टर होम नगर परिषदेच्या बचत भवनात सुरवात करण्यात आले.या ठिकानी प्रवासी नागरिकांना राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी अहेरी वरून भोपाळ जाणाऱ्या 8 लोकांना आणि बल्लारपूर शहरातील निराश्रित 5 लोकांना यात आसरा देण्यात आला.तसेच नगर परिषद बल्लारपूर हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की ज्या गरजू व्यक्तिंना कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन कालावधीत राहण्याची सोय नाही. अशा व्यक्तींसाठी नगर परिषद ने बचत भवन नगर परिषद बल्लारपूर चे कार्यालयाचे मागे येथे रैन बसेरा ची सोय केलेली आहे.
या करिता गरजू व्यक्तींनी नोंदणी साठी
श्री. अभिजीत मोटघरे मो.नं:8600694021,श्री.नरेश गेडाम मो. नं:9764222386,न.प. व्हॉट्सअप क्र.9130052358,
टोल फ्री क्र .18008330733 वर संपर्क साधावा.
नगर परिषद बल्लारपूर मार्फत शहरातील प्रमुख विविध ठिकाणी हात धुण्याकरिता पाणी व हँड वॉश ची वेवस्था करण्यात आली आहे. अशा या विविध उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




0 Comments