जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 50 टक्के होणार

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात
अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 50 टक्के होणार
चंद्रपूरदि.20 मार्च : देशांमध्ये कोरोना विषाणूंमुळे बाधित रुग्ण आढळून येत आहे. या विषाणूंचा प्रसार महाराष्ट्र राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये. यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग  शासन निर्णय क्र.समय-2020/प्र.क्र.35/18(र.व.का) दिनांक 18 मार्च 2020 अन्वये कार्यालयातील एकूण अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 50 टक्के राहील असे निर्देश प्राप्त झालेले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे तातडीचे व महत्त्वाचे काम चालू राहण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व अधिकारीकर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलाविता त्यांना आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे.अशी कार्यवाही करतांना कार्यालयातील एकूण अधिकारी,कर्मचारी यांची संख्या 50 टक्के राहील,याची दक्षता घेण्याची बाब विभाग प्रमुख,कार्यालय प्रमुख यांचेवर राहील. ज्या अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल त्यांनी त्यांची प्रलंबित राहिलेली कामे कार्यालयातील उपस्थितीच्या दिवशी पूर्ण करावीत.
जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख यांची त्यांचे अधिनस्त अधिकारी,कर्मचारी यांचा संपर्क पत्ता,मोबाईल क्रमांकईमेल आयडी कार्यालयामध्ये उपलब्ध करून घेणे तसेच संपर्क पत्त्यावर ते उपलब्ध राहतील याची विभाग प्रमुख,कार्यालय प्रमुख यांनी दक्षता घ्यावी.तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्यास त्यांना त्यानुसार कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील.त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक बंद ठेवू नये याची नोंद घ्यावी.
शासकीय कार्यालयातील जे अधिकारी,कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करावी तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता परिवर्तित रजा सुद्धा त्यांना मंजूर करण्यास हरकत नाही.
शासन निर्णयानुसार हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांना लागू राहणार नाही.त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर ज्या अधिकारी,कर्मचार्‍यांना त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते. अशा कार्यालयांना व आपत्कालीन,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांना सुद्धा हा आदेश लागू राहणार नाही
सदर आदेश दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून लागू राहील.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी संदर्भीय शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments