वरोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आढावा बैठक
वरोरा। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा वरोरा कार्यकारिणी गठीत झाल्यानंतर 17 मार्च ला पूर्व विदर्भ प्रांतीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे सर यांचे अध्यक्षतेखाली व चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील बोकडे सर यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे,कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा.महेश पानसे यांनी आपल्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या शाखा च्या महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक या तीन राज्यात विस्तार झाला असून,पत्रकारांच्या हिताचे अनेक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडून मंजूर करून घेण्यात पत्रकारसंघाला यश आले आहे.पत्रकार संघातील सदस्यांनी तळागाळातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी सक्षम राहून कार्यतत्पर असावे.तसेच संघात एकसूत्रता ठेऊन संघटन मजबूत करण्याकडे पत्रकारांचा कल असणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन प्रा.महेश पानसे सरांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून मत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे ,तालुका अध्यक्ष प्रा.वसंत माणुसमारे,श्याम ठेंगडी,बाळू भोयर ,प्रविण गंधारे या पत्रकार बंधूंनी मार्गदर्शन केले.
बैठकीत राज्य कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी असलेल्या दिनदर्शिका संघातील सदस्यांना वितरित करण्यात आले.
बैठकीत पत्रकार जयंत आंबेकर, श्रीवास्तवजी ,शाहिद अख्तर , राजेंद्र मर्दाने, सादिक थैम,मनिष भुसारी,सतीश चव्हाण,हरीश केशवानी, प्रदीप कोहपरे आदी पत्रकार बंधूंची उपस्थिती होती.



0 Comments