जिल्ह्यातील बोगस मजूर सेवा सहकारी संस्थेवर कारवाई करा.
◾मनसे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे यांची मागणी, कारवाई न झाल्यास जिल्हा उपनिबंधक यांच्यावर न्यायालयातून गुन्हे दाखल करण्याचा दिला इशारा.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था हया बोगस मजूर दाखवून व मिळालेले काम इतरांना देऊन शासनाची फसवणूक करीत असतांना त्यांचे संरक्षण सावकारी प्रकारणात न्यायासाठी आलेल्या शेतकऱ्यावर जिल्हा उपनिबंधक अन्याय करीत असल्याने येत्या 10 दिवसात बोगस मजूर सहकारी संस्थेवर कारवाई करा अन्यथा न्यायालयातून गुन्हे दाखल करू असा इशारा जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या पत्रातून मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी दिल्याने आता बोगस मजूर सेवा सहकारी संस्थेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य हें सहकार क्षेत्रामुळे अधिक प्रगतशील झालं असतांना आज मात्र याचं सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याने सहकार क्षेत्र कोळंमडलं आहे, दरम्यान मजुरांना हक्काचं काम मिळावं म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार मजूर सहकारी संस्थांची जिल्हा व तालुका निहाय नोंदणी करण्यात आली आहे, या संस्थेमध्ये श्रमाची विक्री करून वेतनाच्या मोबदल्यात उत्पादन कार्य केले जात असल्याचे या कायाद्यात नमूद केले आहे. पण संस्थेचे सभासद प्रत्यक्ष श्रम करतात आणि त्या श्रमाच्या मोबदल्यात वेतन मिळवतात असा या संस्थेचा उद्देश असतांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत नोंदणी करण्यात आलेल्या सगळ्याचं मजूर सहकारी संस्था ह्या बोगस मजूर दाखवून व बनावट कागदपत्रे तयार करून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करतात व एक प्रकारे शासनाची फसवणूक केल्या जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक 14/2/2025 ला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवेदन दिले होते, व त्यानंतर दिनांक 26/8/2025, दिनांक 29/9/2025 ला व दिनांक 13/11/2025 स्मरणपत्र देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान या संदर्भात अजूनपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत कुठलीही कार्यवाही न करता उलट या संदर्भातील तक्रारकर्त्यांनाचं पुरावे मागितले आहे, ज्याअर्थी जिल्हा उपनिबंधक स्वतः मजूर सेवा सहकारी संस्थांना कोट्यावधी रुपयाची कामे वाटप करतात, त्यांच्या संस्थांची नोंदणी होते आणि त्यावर देखरेख यांचीच आहे असे असतांना जर जिल्हा उपनिबंधक बोगस मजूर सहकारी संस्थांचे पुरावे मागत असतील तर हा मोठया स्कॅम्प आहे आणि स्वतः जिल्हा उपनिबंधक यामधे सामील आहे आणि त्यामुळे मनसे कडून मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, तालुका अध्यक्ष राज वर्मा व इतर महाराष्ट्र सैनिकउपस्थित होते.






0 Comments