16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

 



16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) :  समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. फेब्रुवारी 2026 महिन्याचा तिसरा सोमवार दि. 16 रोजी  असल्याने या दिवशी दुपारी 1 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी, तथा अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणी/ समस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतील, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावे. प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल.  तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी  भस्मे यांनी कळविले आहे.





Post a Comment

0 Comments