६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा यशस्वीपणे संपन्न
◾मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनांक १५ व १६ आक्टोंबर २०२५ रोजी सामाजिक प्रबोधन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा सोहळा चंद्रपूर येथे दिनांक १५ व १६ आक्टोंबर २०२५ रोजी सामाजिक प्रबोधनाने आरंभ करुन भव्य भोजनदानाने सांगता करण्यात आली.
या दोन दिवसीय सोहळ्याचे उद्घाटन दिनांक १५ आक्टोंबरला महावितरण कंपनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा.हरीष गजभे साहेब यांच्या मंगल हस्ते व चंद्रपूर मंडळाचे अधिक्षक अभियंता मा.संध्या चिवंडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोहळ्याचे मुख्य अतिथी संघटनेचे केंद्रीय कायदेविषयक सल्लागार मा.नरेंद्र जारोंडे साहेब, केंद्रीय उपाध्यक्ष मा.गौतम रामटेके साहेब, केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सुशांत श्रुंगारे साहेब,सोहळ्याचे मुख्य वक्ते मा.ऍडो.भुपेंद्र रायपूरे सर तसेच पारेषण कंपनी अ.उ.दा.चंद्रपूरचे अधिक्षक अभियंता मा. अमलेश लोणारे साहेब, एच व्हि डी सी चे अधिक्षक अभियंता मा.कैलाश प्रगट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संघटने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्याही उपस्थित संपन्न झाला.
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष आणि इतरही मान्यवरांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद करून जगाला युध्दाची नाही तर बुध्दांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विशेष अतिथी जारोंडे साहेबांनी बुध्द तत्वज्ञानाबरोबरच आपल्या संघटनेचे महत्व यावरती प्रकाश टाकला. मुख्य वक्ते रायपूरे सरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायासाठी संविधानीक मार्गाने नोकरदार वर्गांची जबाबदारी यावरती विस्तृत मार्गदर्शन केले. दिनांक १६ आक्टोंबरला दिक्षाभुमीच्या स्थळाची प्रेरणा घेण्यासाठी आलेल्या असंख्य बंधु भगिनींना संघटनेच्या वतीने भोजन दानाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे परिमंडळ सचिव मा.विवेक पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार परिमंडळ अध्यक्ष मा. जे पी मेश्राम यांनी मानले.
६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी माननीय गौतम जे. रामटेके, केंद्रीय उपाध्यक्ष, महानिर्मिती, माननीय नरेंद्र डोंगरे, अध्यक्ष, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, शाखा महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर, माननीय पंकज दवाडे, सचिव, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर, माननीय जयपाल मेश्राम, परिमंडळ अध्यक्ष महावितरण चंद्रपूर, माननीय विवेक पाटील परिमंडळ सचिव महावितरण चंद्रपूर, माननीय कुणाल पाटील, संघटक, महावितरण चंद्रपूर, माननीय संजय उंदीरवाडे, सर्कल सचिव एच व्ही डी सी ग्रहण केंद्र संवसु मंडळ, महापारेषण चंद्रपूर, चंद्रपूर मंडळ अध्यक्ष माननीय विनोद भलमे यांच्या नेतृत्वाखाली माननीय सर्वश्री दिलीप वाळके, चंद्रकांत सुरवाडे, विकास गेडाम, संदिप सातकर, अमोल पारखी, राकेश दसेकर, अशोक चुनारकर, सुशांत जुनघरे, प्रभुदास चिवंडे, राज राहुलगडे, राहुल परचाके, एल आय थाटकर, सुधीर चौधरी, प्रविण शेंडे, प्रितम बारसागडे, मिथुन शेंडे, अरविंद कातकर, मिलिंद गवई, राजू पाटील, ढवस, रोहीतजी, माननीय विजय नेवारे महापारेषण चंद्रपूर, माननीय विशाल डोळस, महानिर्मिती, चंद्रपूर यांनी तन-मन-धनाने सहकार्य करुन मागील एक महिन्यापासून विशेष परीश्रम केले व इतरही विभागीय, प्रविभागीय, परिमंडळ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आर्थिक सहयोग देऊन सहकार्य केले.














0 Comments