बल्लारपूर शहरात एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील डॉ. आंबेडकर वार्ड परिसरात आज बुधवारी सकाळी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत महिलेचे नाव श्रावणी सुरज केशकर ( वय २९ वर्ष ) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास मृत महिलेचा नातेवाईक काही कामानिमित्त घरी गेला असता, श्रावणी हिने घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ही बाब त्याने तत्काळ घरच्यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविला.
सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा संदीप दुर्योधन व महिला पोलीस अंमलदार रुपाली माथनकर करीत आहेत.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






0 Comments