जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा
◾पत्र परिषदेच्या माध्यमातुन ठेका कामगार रोशन हरबडे यांची पोलिसांकडे मागणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : कोळसा खाणीत किंवा जवळच्या कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची मागणीसाठी परिसरातील 200 कंत्राटी कामगार संघर्ष करत आहेत. त्यांनी या संदर्भात आंदोलनही केले.
परंतु कामगारांच्या आंदोलनाच्या भीतीमुळे आंदोलनकर्त्यांना अज्ञात फोन नंबरवरून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या संदर्भात कंत्राटी कामगार रोशन हरबडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे गडचांदूर पोलिसांकडे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यां अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, ते गेल्या दहा वर्षांपासून कोळसा खाणीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. त्यांचा करार नुकताच संपला आहे आणि ते येणाऱ्यां कंपनीत किंवा परिसरातील इतर कोणत्याही कंपनीत कामावर घेण्याची मागणी करत आहेत. यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. दरम्यान 19 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता एका अनोळखी व्यक्तीने अनोळखी नंबरवरून सांगितले की, तू जे करतोयस ते करू नकोस, तुझ्या कुटुंबासोबत आनंदी राहा, तिथून निघून जा, नाहीतर मी तुला इशारा दिला आहे. मी लवकरच तुला त्याचे परिणाम दाखवेन, पोलिसांकडे जा आणि तक्रार दाखल कर, मी माझी शिक्षा भोगून नुकताच परतलो आहे,असे म्हणत त्याने फोन ठेवला.
मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी वेकोली विरोधात निषेध केला आणि नागपूरपर्यंत पैदल निदर्शने केली. तसेच, आम्ही अनुभवी आणि स्थानिक असल्याने वेकोली अंतर्गत परिसरातील काही इतर कंपन्यांमध्ये नोकरी देण्याची मागणी केली. आम्ही संवैधानिक पद्धतीने निषेध करत आहोत. बेरोजगारीने कुटुंबावर संकट ओढवले आहे. रोशन हरबडे यांनी गडचांदूर पोलिसांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
0 Comments