पाकिस्तान दहशतवादाविरुध्द सर्जिकल स्ट्राईक शक्तिशाली सैन्य सज्जतेचा परिचय - हंसराज अहीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ‘‘ऑपरेशन सिंदुर’’ सर्जिकल स्ट्राईक करुन भारताने बदला घेत पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सडेतोेड उत्तर दिल्याबद्दल पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व तिन्ही सैन्यदलांचे अभिंनदन करुन याविशेष कामगीरीवर गर्व व्यक्त केला आहे..
कोटली, मुज्जफराबाद व बहावलपुर सह 9 आतंकी तळांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक द्वारे शेकडो आतंकवाद्यांचा खातमा करुन भारताने आपल्या भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा हिशेब चुकता केला. दहशतवादी संघटनांनी पुन्हा पुन्हा भारताच्या सीमांकडे करड्या नजरेने बघण्याचे धाडस करु नये अन्यथा जगाच्या नकाशावरुनच पुसुन टाकू हा पाकिस्तानला दि. 07 मे रोजी पहाटे केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मधुन दिलेला थेट इशाराच आहे.
‘‘देश प्रथम’’ ही मा. नरेंद्र मोदीजींची निती व स्पष्ट भुमिका आहे. देशाविरुद्ध रचल्या जाणारे कोणतेही कट कारस्थान सहन केले जाणार नाही, त्याची किंमत वसुल करण्याची धमक मोदी सरकारची आहे. आमचे सैन्यदल यासाठी सक्षम आहेत. हेच या सर्जिकल स्ट्राईक ने पुन्हा एकदा दाखवून दिले. अत्यंत नियोजनबध्द व मानवीय दृश्टीकोनाचा परिचय देत पाकिस्तानी नागरीक व तेथील सैन्यदलास इजा न पोहचविता भारताने दहशतवादाविरुध्द केलेला सर्जिकल स्ट्राईक हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी म्हटले आहे.
0 Comments