राजीव गांधी अभियांत्रिक महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.
◾मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शहरातील प्रख्यात राजीव गांधी अभियांत्रिक महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय कला मंचद्वारे आयोजित रंगमंच रिलोडेड च्या नावाने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 मे ला महाविद्यालयच्या सभागृहात करण्यात आले होते, दरवर्षी होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती असतें मात्र महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अधेवार यांना या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, यावेळी अमन अधेवार यांनी युवा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला, या कार्यक्रमात स्टैंड-अप, ड्रामा, कविता,नृत्य, रैंप वाक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात अमन अंधेवार यांनी स्पर्धेत जिंकलेल्या स्पर्धकांना पुरस्कार व सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव केला, दरम्यान मनसे अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या उपस्थितीने व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने युवा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला, सकाळी 11.00 वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सायंकाळी 5.00 वाजता बक्षीस समारंभाने सांगता करण्यात आली.
0 Comments