महात्मा ज्योतिबा फुले ( हिंदी/ऊर्दू/तेलुगू ) विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महात्मा ज्योतिबा फुले (हिंदी/ऊर्दू/तेलुगू) विद्यालय बल्लारपूर, सत्र 2024-2025 चा SSC बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला असून, शाळेचा एकूण निकाल 74% टक्के लागला आहे.
यात विद्यालयातून प्रथम कु. सनोबार मो. अन्वर हिला 87% गुण, द्वितीय कु. आसीया मो. सय्यद हिला 82% गुण, आणि तृतीय अनुज रामबरण निषाद याला 77% गुण मिळाले आहे. तरी या सर्व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था सचिव तथा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सुभाष ताजने सर, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मकसूद अहेमद सर, तथा सर्व शिक्षक गण यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले व सर्व प्राविण्याप्राप्त विद्यार्थ्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील भविष्यातील प्रगतीसाठी शुभकामना दिल्या. तसेच ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, चे अध्यक्ष आदरणीय ऍड. जयंतराव साळवे साहेब यांनी सुद्धा प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments