महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारीपदी विशाल भास्करराव पिपरे

 



महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारीपदी विशाल भास्करराव पिपरे

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 19/05/2025 महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारीपदी विशाल भास्करराव पिपरे रुजू झाले असून, नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. यापुर्वी ते महावितरणच्या जळगाव परिमंडळात 2 वर्षे व अकोला परिमंडळ येथे 7 वर्षे कार्यरत होते. 

अकोला येथे येण्यापुर्वी व्यवस्थापक (मा.स.) म्हणून अंबूजा सिमेंट व बल्लारपूर पेपर मिल मानव संसाधन व औदयोगिक संबंध या विषयावर कार्य केले आहे. मुळचे चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद ज्युबिली हायस्कुल चंद्रपूर येथे आणि औदयोगिक संबंध आणि कामगार अभ्यासाचे पदव्युत्तर शिक्षण हे नागपूर विदयापीठ येथे पूर्ण झाले. चंद्रपूर परिमंडळात रुजू होताच चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिश गजबे व चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी विशाल पिपरे उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.




Post a Comment

0 Comments