चंद्रपूरात काँग्रेसची तिरंगा रैली.

 





चंद्रपूरात काँग्रेसची तिरंगा रैली.

◾दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता चंद्रपूर येथे काँग्रेसची तिरंगा रैली  

◾आपरेशन सिंदूर च्या वीर जवानांचे आणि अतिरेकी हल्ल्यातील बलिदानांचे केले जाणार स्मरण.

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी व अतिरेकी हल्यात बलिदान दिलेल्या जवान व नांगरिकांप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ : ३० वाजता चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते प्रियदर्शनी स्व. इंदिरा गांधी चौक पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संपूर्ण राज्यातील जिल्हास्तरावर तिरंगा यात्रा काढून आपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वीर सैनिकांचे शोर्य आणि दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या नागरिकांचे स्मरण यानिमित्ताने करण्याचा संकल्प केला आहे हे विशेष. या तिरंगा यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार अॅड. अभिजित वंजारी, आमदार सुधाकरराव अडबाले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यासह जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, एनएसयूआय, सेवादल, इंटक, किसान काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

यानिमित्ताने दिनांक २१ मे २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक चंद्रपूर येथे सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या तिरंगा यात्रेत जिल्ह्यातील माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, आघाडी संघटनेचे पदाधिकारी, प्रत्येक ब्लॉक मधून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केले आहे.  या पत्रपरिषदेत सुभाष धोटे,प्रतिभा धानोरकर,रामु तिवारी,विनायक बांगडे,विनोद दत्तात्रेय,प्रवीण पडवेकर,नंदू नागरकर सुनीता लोढ़िया,सुधाकर सिंग गौर उपस्थित होते .




Post a Comment

0 Comments