जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त ८ मे २०२५ रोजी विविध कार्यक्रम आयोजित
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : जागतिक रेड क्रॉस दिन हा दरवर्षी ८ मे रोजी संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. जागतिक युद्धामध्ये व युद्धविरामानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाजसेवा करण्याच्या उद्देशाने रेड क्रॉस संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात देखील जागतिक रेड क्रॉस दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने आझाद गार्डन, चंद्रपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांसाठी मोफत ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, चंद्रपूर शाखेचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, सहसचिव डॉ. संजय घाटे, कोषाध्यक्ष शादाब चिनी, डॉ. भानुदास दाबेरे, पियुष मेश्राम, निलेश पझारे, अश्विनीताई खोब्रागडे, डॉ. आशिष बारब्द आणि प्रशांत हजबन यांनी सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रेड क्रॉसच्या सेवाभावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments