बल्लारपूर क्षेत्रातील, ८४ प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गी प्रकल्पग्रस्तांनी सन्मानपूर्वक मानले अहिर यांचे आभार

 





बल्लारपूर क्षेत्रातील, ८४ प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मार्गी प्रकल्पग्रस्तांनी सन्मानपूर्वक मानले अहिर यांचे आभार  

◾जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ एप्रिल २०२५ व २४ सप्टेंबर २०२४ रोजीच्या निर्णयास वेकोली बाध्य  

             ◾नवीन तुकडेबंदी सुधारणा कायदा,२०२४ राज्य सरकार कडून पारित 

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दि.११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडून बल्लारपूर क्षेत्र यु,जी टू ओ.सी.धोपटाळा प्रकल्पातील तुकडेबंदी कायदा १९४८, अवहेलना फेरफार प्रकरणात,9 प्रकल्पग्रस्तांची अपील मान्य करण्यात आली असून यानुसार या प्रकल्पातील स्थगित असलेल्या ८४ नोकरी प्रस्तावातील मंजुरीची अडचण दूर झाल्याचे, रवीभवन नागपूर येथिल बैठकीत  सी.एम.डी,नागपूर यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,यांना सांगितले.

         यु जी टू ओसी धोपटाळा प्रकल्पातील नोकरी प्रस्ताव मंजुरी प्रक्रिया सुरु असताना, 9 सातबारा धारकांच्या विरोधात बल्लारपूर वेकोली प्रबंधनाने उच्च न्यायालय, नागपूर, येथे तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात फेरफार रद्द करण्याबाबत दि. २० जुलै २०२२ रोजी याचिका दाखल केली होती.याबाबत ओबीसी व अन्य प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.याची दखल घेत हंसराज अहिर, यांनी तात्काळ बैठक व सुनावणी घेवून प्रबंधानाला शेतकऱ्यांच्या  हक्काच्या  नोकऱ्यांना  विरोध न करण्याच्या सूचना दिल्या.

        सदर प्रकरणे महसूल अधिकारी यांच्या आदेशाने निकाली काढण्यात यावीत असा आदेश उच्च न्यायालयात पारित झाल्यानंतर, उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचेकडे प्रबंधानाकडून अपील दाखल करण्यात आली.

      हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांचेकडे विचाराधीन असताना,या विषयावरील वेकोली अंतर्गत सर्वच नोकरी प्रस्तावांची मंजुरी थांबून ठेवण्याच्या सूचना, वेकोली मुख्यालयाकडून    क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या.जिल्हधिकरि चंद्रपूर यांचकडे या विषयाबाबत मागासवर्ग आयोगाचे माध्यमातून दि. ११/०७/२०२४ व दि. २०/०२/२०२४ रोजी जनसुनावणी घेण्यात आली.या प्रकरणात जिल्हाधिकारी, चंद्रपुर देतील तो निर्णय मान्य करण्याचे वेकोली प्रबंधानाने सुनावणी दरम्यान आश्वस्त केले होते.

      या प्रकरणात उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी ८४ प्रकल्पग्रस्तांचे झालेले फेरफार नीयमितीकरण योग्य आहे असा आदेश प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने दि. २४/०९/२०२४ रोजी पारित केला.त्यानुसार बल्लारपूर क्षेत्राकडून नोकरी प्रस्ताव मुख्यालयाला मंजुरी हेतू पाठविण्यात आले परंतु वेकोली मुख्यालयाने, अन्यायकारक भूमिका घेत, याच प्रकल्पातील 9 सातबारा धारकांच्या बाबतीत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचेकडील दाखल अपीलचा निकाल लागेपर्यंत सदर ८४ व  या विषयावरील अन्य नोकरी प्रस्ताव थांबविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडून 9 प्रकल्पग्रस्तांच्या, सातबारा नियमितीकरणाबाबत पारीत झालेल्या उपरोक्त आदेशानुसार सर्व ८४ प्रकल्पग्रस्तांचे नोकरी प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्याच्या,वेकोली मुख्यालयाच्या तसेच वेकोलीला बाध्य करणाऱ्या=जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त करीत प्रकल्प्ग्रस्तानी हंसराज अहिर यांच्या निवासस्थानी जावून न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रकाल्प्ग्रस्तानी अहिर यांचा शाल श्रीफळ व पुष्प्गुच्ह देवून आनंद साजरा केला.

यासोबतच नवीन तुकडेबंदी सुधारणा कायदा,२०२४ राज्य सरकार कडून पारित झाल्याने या कालावधीतील सर्व प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा निर्धार अहिर यांनी या वेळी व्यक्त केला.




Post a Comment

0 Comments