ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी झालेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार - मुनगंटीवार

 





ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी झालेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार - मुनगंटीवार

◾आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

◾आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्य अभियंत्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांवर महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्यासमवेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृह येथे घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करुन ठोस कार्यवाही करण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सूचित केले.ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

याबैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड,रामपाल सिंग,अनिल डोंगरे, हनुमान काकडे आदिंची उपस्थिती होती.

आरओ मशीन त्वरित दुरुस्तीसाठी सीएसआर निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विद्युत कनेक्शन देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. 

ऊर्जानगर वसाहतीच्या नूतनीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन वसाहतीच्या सुधारणेसाठी नियोजनबद्ध कामे हाती घ्यावी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 2 एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच परिसरातील युवकांसाठी अत्याधुनिक जिम उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच, पर्यावरण संवर्धनासाठी 2 लाख कडुलिंबाची झाडे ऊर्जानगर परिसरात लावण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.या भेटीत झालेली ही सर्वसमावेशक चर्चा ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार आहे.




Post a Comment

0 Comments