मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर शाळेचा एकूण 88.09% निकाल
◾84 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
◾एस. एस. सी. बोर्ड परीक्षा 2025 निकाल जाहीर
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात दहावीच्या मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादित केले असून .शाळेचा एकूण 88.09% निकाल लागला आहे यामध्ये प्रथम क्र. कु. हिमांशी सुमेरसिंग पवार - 86.20% गुण प्राप्त केले. द्वितीय क्र.कु. पूजा जयचंद्र निषाद - 74.60% गुण प्राप्त केले. तसेच तृतीय क्र.कु. हंसिका धनराज निषाद - 73. 00% गुण प्राप्त केले आहे. या एकूण निकालामध्ये प्रथम श्रेणीत एकूण 20 विद्यार्थिनींना यश मिळाले असून द्वितीय श्रेणी मध्ये एकूण 22 विद्यार्थिनींनी यश मिळवला आहे.
शाळेमधील एकूण 84 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. हिमांशी सुमेरसिंग पवार यांच्या घरी जाऊन प्राचार्या असमा खान खलिदी मॅडम व सर्व शिक्षक वृंद मिठाई व पुष्पगुच्छ देऊन तिचे कौतुक केले.
या यशाबद्दल बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर चे संस्थापक श्री.जैनुद्दीन जव्हेरी सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या.
0 Comments