11 मे ला बहुजन समता पर्व निशुल्क दाखविणार फुले चित्रपट पत्रपरिषदेत डाॅ. कांबळे यांची माहीती
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बहुजन समता पर्व चे डा. दिलीप कांबळे व त्यांच्या टिम च्या माध्यमातून महात्मा ज्योतीबा फुले चित्रपटाचा निशुल्क शो 11 मे रोजी सायंकाळी 5 ते 9 च्या दरम्यान सपना टॉकीज मध्ये नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. दिलीप कांबळे ने पत्र परिषदेत दिली.
आमदार विजय वडेट्टीवार च्या संकल्पनेतून चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. या एका शो मध्ये 900 सीटांची व्यवस्था राहणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयेाजन केले आहे. याचा लाभ घेण्याचे आह्वान डा. दिलीप कांबळे यांनी केले आहे.
पत्रपरीषदेला एड. दिलीप कांबळे, एड. वैशाली टोंगे, एड. मनोज कवाडे, प्रा. कोमल खोब्रागडे, विनोद लभाने उपस्थित होते.








0 Comments