मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपुर शहर येथे शुक्रवारी दिनांक 28 /2/ 2025 शुक्रवारला मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सी. वी. रमण यांच्या प्रतिमेला माल्यारपण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.असमा खान खालीदि मॅडम उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका विमल रच्चावार मॅडम उपस्थित होत्या. वर्ग आठवीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. व कुमारी गीतांजली कुमार अमृता निषाद यांनी भाषण प्रस्तुत केले. वर्ग नववीच्या कुमारी गीतेश देवांगण आणि साक्षी अंबाला यांनी विज्ञानावर आधारित छोटे छोटे प्रयोग सादर केले. तसेच अकरावीच्या विद्यार्थिनी कुमारी कशीश सिंग व पूनम चव्हाण यांनी सुद्धा विज्ञानावर आधारित प्रयोग सादर केले. श्री. तुषार चौधरी सरांनी आपल्या भाषणातून सी .व्ही. रमण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. रचावार मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे आपल्या भाषणातून योग्य मार्गदर्शन केले.
त्याच्यानंतर आसमा मॅडम यांनी आपले अध्यक्षीय भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना आपण करत असलेल्या दैनंदिन प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना प्रयोगाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच शेवटी सीमा धाडवे मॅडम यांनी विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली. कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी बल्की तिने केले तर आभार प्रदर्शन अकरावीची विद्यार्थिनी कुमारी धरती पुडके हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले .
अशा रीतीने मोठ्या थाटामाटाने विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
0 Comments