मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर द्वारे संविधान दिनानिमित्त 'घर घर संविधान' उपक्रमा
बल्लारपुर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर मध्ये घर घर संविधान या उपक्रमा अंतर्गत संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी प्राचार्या सौ. असमा खान खलिदी मॅडम व सौ. रच्चावार मॅडम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्ल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या 'घर घर संविधान' अंतर्गत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आलेली होती. त्याचबरोबर संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच श्री. प्रशांत बनकर सर व आमटे मॅडम यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सुरावर मॅडम यांनी संविधानाचे महत्त्व व मूल्य विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेऊन त्याचबरोबर संविधान पर गीत म्हणून कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या सर्व विद्यार्थिनी,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.













0 Comments