आत्मविश्वास पाहून आमदार जोरगेवार म्हणाले, 'तू पुन्हा धावशील'

 








आत्मविश्वास पाहून आमदार जोरगेवार म्हणाले, 'तू पुन्हा धावशील

◾अपघातात पाय गमावलेल्या पूजाची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक 16 जुलै 2024 ला  दुचाकीने जात असलेल्या पूजा हलदार हिचा अपघात झाला होता. या अपघातात तिला एक पाय कायमचा गमवावा लागला. दरम्यानआमदार किशोर जोरगेवार यांनी पूजाच्या खुटाळा येथील राहत्या घरी तिची भेट घेतली. या भेटीदरम्यानअपघात होऊनही पूजामध्ये ओढावलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आत्मविश्वास दिसत होता. हा आत्मविश्वास पाहून, "पूजातू पुन्हा धावशील," असे उद्गार आमदार जोरगेवार यांच्या तोंडून निघालेआणि पूजाच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

  खुटाळा येथील रहिवासी असलेली पूजा पडोली येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी कामावरून घरी परतत असताना पूजाची स्कूटी स्लिप होऊन ती खाली पडली. यावेळी मागून येणाऱ्या ट्रकचा तिच्या पायाला धक्का लागल्याने तिला एक पाय कायमचा गमवावा लागला. मात्रअपघातग्रस्त अवस्थेतही पूजाने धीर न हारता घरच्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतःच रुग्णालयात जाण्यासाठी ऑटो थांबवले. नंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतुपायाची स्थिती गंभीर असल्याने तिचा पाय कापावा लागला.

   या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी तिच्या राहत्या घरी भेट दिली. पूजाने त्यांना अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला. घरची परिस्थिती हलाखीची असूनहीखचून न जाता लवकर बरी होऊन पुन्हा कामावर जाण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रसंगातही पूजाचा आत्मविश्वास आणि तिचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. पूजाचे हे धाडस दिव्यांगत्व आल्यामुळे निराश झालेल्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.





Post a Comment

0 Comments