पावसामुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदतीचा हात
◾मतदार संघातील पिडीत कुटुंबांना ताडपत्री, धान्य किट आणि आर्थिक मदत
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : मागील काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घरांची पाहणी केली असून पिडीत कुटुंबांना ताडपत्री, धान्य किट आणि आवश्यक तिथे आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, वंदना हजारे, विमल कातकर, आशा देशमुख, अल्का मेश्राम, आदींची उपस्थिती होती.
यंग चांदा ब्रिगेडच्या या मदत कार्यामुळे पिडीत कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे आणि यंग चांदा ब्रिगेडच्या तातडीने कार्यवाहीमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक ती मदत मिळाली आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या वेळी तातडीने मदत पोहोचवून पिडीत कुटुंबांना मोठा धीर दिला आहे.
मागील काही दिवसांत चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक घरांची पडझड या पावसामुळे झाली आहे. त्यामुळे अशा भागांची पाहणी करून मदत करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील राष्ट्रवादी नगर, लालपेठ, बाबूपेठ, रयतवारी,





.png)


0 Comments