बल्लारपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत दोनतुलवार यांची निवड

 








बल्लारपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रशांत दोनतुलवार यांची निवड

◾पदाधिकाऱ्यांचा पार पडला पदग्रहण सोहळा : नवीन कार्यकारिणी राबविणार विविध उपक्रम

 बल्लारपुर/विसापूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : बल्लारपूर शहरात मिनी भारत वसला आहे. येथे रोटरी क्लब विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. या अनुषंगाने रोटरी क्लबची नुकतीच नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आले.एका कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पद ग्रहण सोहळा पार पडला. यामध्ये बल्लारपूर शहर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विसापूर येथील चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत दोनतुलवार यांची निवड करण्यात आली.

बल्लारपूर शहर रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणी रोटरी क्लबचे उपप्रान्तपाल श्रीकांत रेशीमवाले यांच्या प्रमुख उपस्थित गठीत करण्यात आली.दरम्यान नवनियुक्त रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत दोनतुलवार यांना मावळते अध्यक्ष राहुल वारू यांनी काॅलर प्रदान करून पदभार सोपवीला.

बल्लारपूर शहर रोटरी क्लबची नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रशांत दोनतुलवार,सचिव उत्तम पटेल,सहसचिव निलेश चिमडलवार,रोखपाल मनीष मुलचंदानी,निर्देशक कल्पेश पटेल,सुरेश कुकरेजा,महेश कायरकर,राजू मुंद डा, उमेश पटेल,अनुप गंगशेट्टीवार यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत दोनतुलवार यांनी वर्षभरात करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी निखिल गुजरकर,राहुल वारू,राजू पटेल,प्रफुल्ल चरपे, विक्रांत पंडित,सचिन तल्हार,अखिल निखारे,शैलेश झाडे, डा.प्रशिक वाघमारे,अजय वासलवार आदींची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments