बल्लारपुर नगरपरिषद चा लिलावातला भंगार चोरी छुपे वादग्रस्त लिलावाची चौकशी होणार लवकरच




बल्लारपुर नगरपरिषद चा लिलावातला भंगार चोरी छुपे वादग्रस्त लिलावाची चौकशी होणार लवकरच

 ◾न.प चा एकमेव ठेकेदार जाच्याकडे न.प चे 80% ठेके

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपुर नगरपरिषद चा भंगार लिलावं प्रक्रियेत अनियमितता दिसून येत आहे. या प्रक्रियेत दुय्यम दर्जाचा अधीकारी आपले हात शेकून आजपावत लाखो रुपयाचे नुकसान करीत आपला गल्ला भारत असल्याची चर्चा शहरभर सुरु आहे.

       नगरपरिषद मध्ये सद्या प्रशासकाचे राज्य असून याचाच नेमका फायदा हा भ्रष्ट अधिकारी उचलत आहे. एक फायर ची भंगार गाडी बाजार भावात दोन लाखाचा वर विकल्या जाते मात्र या भ्रष्ट अधिकाऱ्याने गोलमाल करीत नाममात्र भावात दोन चारचाकी व एक फायर ची गाडी न.प चा एकमेव ठेकेदार (जाच्याकडे न.प चे 80% ठेके) आहे. याला विविध नावाने दिले असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे या ठेकेदारचा सुपर वायझर व एक कामगार यांचे नाव टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली गेली व हे सर्व या भ्रस्ट अधिकाऱ्याचा सल्ल्यानेच झाली असल्याचा संशय शहरवासि्यांनी व्यक्त केला गेला आहे. याची सर्व कागदपत्र मिळाल्यावरच सत्य बाहेर येईल. व कार्यवाही होऊ शकेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

विशेष बाब म्हणजे हे वाहन भंगार लायक होते कां तशी आर. टी. ओ. कडून परवानगी घेतली कां? घेतली असल्यास त्याची आर. टी. ओ. ने किमत किती ठेवली? या वाहनाचे लिलावं एव्हड्या घाईघाईने कां करण्यात आले, न.प ची जुनी बिल्डिंग पाडण्यात येत असून त्याचे ही प्रक्रिया संशयचा भोवऱ्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, दि. 1 तारखेचा रात्रौला लिलावाचा भंगार अंधारात नेने असे अनेक प्रश्न बल्लारपूर वासियांना पडला आहे.



Post a Comment

0 Comments