बल्लारपुरात मागील 3 ते 4 दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद, नागरीकांना अडचणीचा सामना
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील वस्ती विभागातील श्रीराम वॉर्ड, जुनी सब्जी मंडी, सुभाष वॉर्ड व सम्शान घाट रोड परिसरातील स्ट्रीट लाईट मागील 3 ते 4 दिवसापासून बंद आहेत त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे शिवाय परिसरात अंधार असल्यामुळं महिलावर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. याबाबत नगर परिषदेने त्वरित लक्ष देऊन नागरिकांची अडचण सोडवावी अशा प्रकारची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.





0 Comments