४ गाळ्यांना चंद्रपूर मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले
◾गाळेधारकांनी केला ३० लाख थकबाकीचा भरणा
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मोठी थकबाकी असणाऱ्या ४ गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने इंडस्ट्रीयल वॉर्ड येथील वुडन इंडस्ट्रीज,शास्त्री नगर येथील शर्मल महातव,शास्त्रीनगर गृह निर्माण संस्था येथील अजय जयस्वाल व राजेश लाडे यांचे गाळे सील करण्यात आले. या ४ गाळ्यांवर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.कर विभागातर्फे अनेक गाळ्यांवर कारवाई प्रस्तावीत होती. जप्ती पथक जाताच यातील अनेक गाळेधारकांनी कराचा पुर्ण भरणा केला मात्र ४ गाळेधारकांनी कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने सदर कारवाई केली आहे.
यात शर्मल महातव थकबाकी ६३,३८१/-रु ,वुडन इंडस्ट्रीज थकबाकी २१०६८/- रु ,शास्त्रीनगर गृह निर्माण संस्था येथील अजय जयस्वाल थकबाकी १५४५६/- रु , राजेश लाडे थकबाकी २७२१२/- रु असे एकुण ४ गाळे सील करण्यात आले. तसेच येथील स्टार बेकरी थकबाकी २,३०,७९६/- ,आनंद लॉटरी सेंटर २५,०००/-,नाईद हुसेन १,०४०९४/-,इन्स्पायर अकेडमी,२,३९,०५२/-, गुलाबराव लहामगे १,४२,२९४/-,हसन इलेकट्रीकल्स ९६,४०४/-,विनोद कावळे ९१,१०३/-, गुरुदेव लॉन यांच्याकडे ६,०२०६४ रुपयांची थकबाकी होती. वसुली पथक जाताच सर्वांनी कराचा पुर्ण भरणा केला आहे.
सदर कारवाई ३ मार्च रोजी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धेत, कर विभाग प्रमुख अनिल घुले,अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,मार्केट लिपिक प्रविण हजारे,मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अतिक्रमण विभाग कर्मचारी पथकाने केली.







0 Comments