न.प. मालमत्ता करावर २ टक्के व्याजवसूलीने उडाला गोंधळ?
मूल ( राज्य रिपोर्टर ) : ३१ डिसेंबर नंतर घरटॅक्स,पाणीकर भरणाऱ्या मूल नगर वासियांना प्रतिमाह २ टक्के व्याज भरण्याची वेळ आल्याने गोंधळ उडाला आहे. तसा नियम जुनाच असला तरी आजवर न.प.प्रशाशनाने या नियमांचे पालन न केल्याने ३१ मार्च पावेतो बिनधास्त राहणाऱ्या नागरिकांना आता जानेवरी ते मार्च या तिन महिण्याचा २ टक्के व्याज भरण्याची पाळी आली आहे. आथिंक वर्षात कराची गणना १ एप़िल ते ३१ मार्च पावेतो करण्यात येत असते.
न.प.ने डिसेंबर अखेर पावेतोच कराचा भरणा कराची सवय नागरिकांना लावून कर वसूलीचा टक्का वाढावा याकरीता न.प.ने आधिच नियम तयार केला आहे. मात्र जनतेला वेठीस धरून पैसा जमा करण्याचे टाळून ३१ मार्च पावेतो कराचा भरणा करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र नवीन मुख्याधिकारी यांनी नियमानुसार कर वसूली चे धोरण कायम केल्याने आता २०२२-२३ चा कर भरणा डिसेंबर २०२२ नंतर करणाऱ्यांना २ टक्के व्याजदराचा अचानक बसल्याने गोंधळ उडाला आहे. सध्या न.प.प्रशाशनावर प्रशाशक असल्याने कुणावर राग काढायचा ? याही विवंचनेत नागरीक आहेत.
मार्च महिन्यात कर भरणा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. २ टक्के व्याजातून न.प.ला मोठी आवक होणार आहे हे जरी खरे असले तरी अचानक बसणाऱ्या व्याजामूळे गोंधळ उडाला हे नक्की.





0 Comments