WCL ( वेकोली ) भटाळी गावाचे पुनर्वसन केंव्हा होणार; मोबदला देण्यात यावा




WCL ( वेकोली ) भटाळी गावाचे पुनर्वसन केंव्हा होणार; मोबदला देण्यात यावा 

◾WCL वेकोली मुख्य महाप्रबंधक चंद्रपूर यांना निवेदन देताना  भटाळी येथील नागरीक रोहीत भारत तुरानकर यांनी केली  मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहर  येथून जवळच असलेल्या भटाळी (पायली) हया गावाला लागून वेस्टर्न कोलफिल्डसची खुली खदान सुरु असून या खदानीचे खोदकाम गावाला स्पर्श करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाकडून व वेस्टर्न कोलफिल्डस कडून या गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी वेस्टर्न कोलफिल्डस कडून सर्वच प्रोसीजर करुन ठेवण्यात आले आहे. परंतु अजूनही या गावाचे पुनर्वसन झाले नाही. तसेच गावातील जनतेला त्याच्या घराचा मोबदला अजुनपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे भविष्यात मुलाबाळाचे संगोपन पुढील शिक्षण कोणत्या पध्दतीने करायचा याचा प्रश्न जनते समोर पडला आहे.

असेही ऐकीवात आहे की, काही बाहेरील व्यक्ती या भटाळी गावात प्लॉट अथवा शेती घेऊन राहत आहेत. त्यांना सुध्दा वेस्टर्न कोलफिल्डस कडून मोबदला या गावात आजन्म वास्तव्य करणा-या नागरिकां सोबतच देण्यात येत आहे. परंतु गावातील आजन्म वास्तव्यास असणा-या नागरिकाची मागणी आहे की, प्रथम त्यांना मोबदला देण्यात यावा व नंतर नव्याने वास्तव्यास असणा-या व्यक्तींना देण्यात यावा अशा या प्रकरणामुळेच या गावाचे पुनर्वसन होण्यास अडचण जात असून केंद्रीय कोयला मंत्रालयाकडून याकडे लक्ष देऊन शक्य तेवढ्या लवकर येथील त्रस्त जनतेला न्याय मिळवून दयावा अशी मागणी भटाळी येथील नागरीक रोहीत भारत तुरानकर यांनी केली आहे. जर अशाच प्रकारे पुन्हा-पुन्हा विलंब होत राहील्यास समस्त भटाळीवासी महाप्रबंधक कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. यावरही समाधान झाले नाही. तर नागपूर येथील सिएमडी कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येईल असाही इशारा रोहीत तुराणकर यांनी दिलेला आहे.



Post a Comment

0 Comments