राज्यस्तरीय मादगी समाज वधू-वर परिचय मेळावा
◾दिवंगत भजनदास आलेवार बहुउद्देशीय संस्थेतर्फे
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दिवंगत भजनदास आलेवार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मादगी समाजाचा राज्यस्तरीय हा वधू-वर परिचय मेळावा येत्या 15 जानेवारी रोजी गोंडवाना कालादलन केंद्र पोटेगाव रोड गडचिरोली येथे होत आहे. आज विवाह जोडण्याकरिता अनेक अडचणी पालकांना असतात. वधू - वर पाहत असताना आर्थिक र्खचसुद्धा येतो. विवाहसाठी मूल-मुली सापडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन या संस्थेने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. शेखर शेखर शेळार ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली ), सहाउद्घाटक मा. प्रा. प्रशांत सोनावणे ( गोंडवाना विद्यापीठ, वाणिज्य शाखा ), अध्यक्ष मा. कबीर निकुरे, सामाजिक कार्यकर्ता ( भारत गौरव अवार्ड सन्मानित ), प्रमुख अतिथी मा. समयाजी पसुला ( माजी जि.प. अध्यक्ष गडचिरोली ), मा. काशिनाथजी देवगडे, मा. प्रा. एच . बी. नकलवार, मा. सुनील मिदै, मा. मुरलीधर लाटेलवार, मा. प्रा. डाॅ. संजय लाटलवार, एम. इ. कोमलवार, रामचंद्र आसामपल्लीवार, किशोर नगराळे, गोपाल रायपूरे या उपक्रमांतर्गत या संस्थेने भेदभाव सोडा समाज जोडा एक पाऊल समाजासाठी असे सामाजिक बांधिलकी दाखवलेली आहे. यापूर्वीही संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. हा कार्यक्रम राज्यस्तरीय असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून वधू वर आपला परिचय देण्याकरिता येत आहेत. इच्छुक असलेल्या आपल्या मुला मुलींची नोंद करावी, असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष विकास गोरडवार, सचिव प्रणय गोरडवार यांनी केले आहे.
संपर्क : संजय पवार -9764832638, विकास गोरडवार-7776860352, प्रणय गोरडवार-9021067008, संतोष मुनघाटे-9130863887
रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी वेळ : सकाळी 11: 00 वा. स्थळ : गोंडवाना कला दालन केंद्र पोटेगाव रोड ( बस स्टँड जवळ गडचिरोली )






0 Comments