1 किलो 700 ग्रॅम गांजा सह दोन आरोपींना अटक




1 किलो 700 ग्रॅम गांजा सह दोन आरोपींना अटक

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : घुग्घुस पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे घुग्घुस शहरातील केमिकल वार्डातील एका घरी व अमराई वार्डात धाड टाकली असता दोन आरोपी गांजा ची विक्री करतांना आढळून आले त्यांना अटक करून त्यांचेकडून एकूण 1 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. 

 घुग्घुस परिसरात लहान लहान पुडी  तयार करून गांजा विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती घुग्घुस पोलीसांना प्राप्त होताच घुग्घुस पोलीस व गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केमिकल वार्ड क्रमांक 3 मधील भीम धुपदेव तिवारी वय २३ वर्ष यांचा घरी धाड टाकली असता 1 किलो 700 ग्राम गांजा हस्तगत झाला व त्याचबरोबर अमराई वार्डातील प्रताप रमेश सिंह वय 23 वर्ष यालाची गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली. 

दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 20, 22, 29 एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत अटक करून यांना चंद्रपूर न्यायालयात हजर केले त्यात त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घुग्घुस बबन पुसाटे, स.पो.नि.मेघा गोखरे, पीएसआय गौरीशंकर आमटे, अवधेश ठाकूर, महेंद्र भुजाडे, मनोज धकाते, रणजित भुरसे, सचिन वसुंधरे, नितीन मराठे, विजय धापकस, समिक्षा भोंगडे, प्रकाश करपे, महेंद्र वन्नकवार आदींनी केली.



Post a Comment

0 Comments