पत्रकारांनी संघटीतपणे काम करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुर्व विदर्भ प्रांताध्यक्ष - प्रा.महेश पानसे
◾गडचिरोली येथे डिजीटल मिडीयाच्या पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा
गडचिरोली ( राज्य रिपोर्टर ) : आजच्या इंटरनेटच्या काळात डिजीटल मिडीयाचा पत्रकार झटपट बातमी वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. गडचिरोली जिल्हयात अनेक पत्रकार असून पत्रकारांनी एकीचे बळ निर्माण करून संघटीतपणे काम करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुर्व विदर्भ प्रांताध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी केले. ते गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे The गडविश्व तसेच लोकवृत्त न्यूज च्या वतीने शुक्रवार ६ जानेवारी रोजी आयोजीत पत्रकार दिन व डिजीटल मिडीया कार्यरत पत्रकारांचा परिचय मेळावा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे पुर्व विदर्भ प्रांताध्यक्ष प्रा.महेश पानसे, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गडचिरोली जिल्हयाध्यक्ष तथा दैनिक भास्कर जिल्हा प्रतिनिधी रूपराजजी वाकोडे, जेष्ठ पत्रकार तसेच D वाईस न्यूज पोर्टल चे संपादक रोहिदासजी राऊत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तुळशीरामजी जांभुळकर, डिजीटल मिडीया असोसिएशन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, चांदा ब्लास्टचे उपसंपादक आशिष रैच, एस न्यूज संपादक सुरज बोम्मावार, खरे वृत्तांत न्यूज पोर्टल संपादक मोरेश्वर उद्योजवार, एस.के. 24 तास न्यूज संपादक सुरेश कन्नमवार, प्रा. सरफराज सर, तसेच सत्कारमुर्ती महाराष्ट्र मत न्यूज 24 तास पोर्टलचे संपादक खोमदेवजी तुम्मेवार व्यासपिठावर उपस्थित होते.
दरम्यान प्रा.महेश पानसे पुढे बोलतांना म्हणाले की, गडचिरोली जिल्हयात बातमी करीता मोठया प्रमाणात डाटा आहे, दररोज नवनवीन विषयावर लिखाण करता येते, सध्यातरी प्रिंट मिडीया, डिजीटल मिडीया, इलेक्ट्रानिक मिडीया चे वर्चस्व असले तरी मात्र या सर्व मिडीयावर सोशल मिडीया उराशी बसून भविष्यात आपली वचक निर्माण करू शकतो व प्रत्येक घराघरात पत्रकार निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण नव्याने काय लिहू शकतो याकडे पुरेपुर लक्ष केंद्रीत करून आपली पत्रकारीता क्षेत्रात वचक निर्माण करावी असेही ते म्हणाले.
जेष्ठ पत्रकार रोहिदासजी राऊत यांनी आयोजीत कार्यक्रमाचे कौतुक केले व नक्कीच अशाप्रकारचा कार्यक्रम होणे आवश्यक आहे. डिजीटल मिडीया हा झटपट काही क्षणात बातमी लोकांपर्यत पोहचविण्याचे काम करीत आहे अशातच पहिल्यांदाच असा कार्यक्रम डिजीटल मिडीयाचा पत्रकारांनी आयोजीक करून डिजीटल मिडीयामध्ये कार्यरत पत्रकारांना एकत्रिक आणण्याचा प्रयत्न करण्यात आला याचे कौतुक केले. रूपराजजी वाकोडे यांनी सुध्दा आयोजीत कार्यक्रमाची प्रशंसा करीत अशाप्रकाराचे कार्यक्रम डिजीटल मिडीयातील पत्रकारांनी एकत्रीतपणे काम करून करावे त्यामुळे संघटन मजबूत होईल असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातून केले.
तुळशीरामजी जांभुळकर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गडचिरोली जिल्हयातील डिजीटल मिडीयामध्ये कार्यरत पत्रकारांनी आयोजीत केलेला पत्रकार दिन कार्यक्रम नक्कीच प्रशंसनीय आहे, तसेच डिजीटल मिडीयातील पत्रकारांनी सामाजिक बांधीलकी जपत अन्नछाया पासून ते मातृभेट असे उल्लेखनिय कार्य केले त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असे म्हणाले. तर कोवीडच्या काळात डिजीटल मिडीयातील पत्रकारांनी आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्यात कुठेही कमी पडू दिली नाही याचा अभिमान असून डिजीटल मिडीयातील पत्रकारांनी आज एक संघटीत होवून कार्य करण्याची गरज आहे असे डिजीटल मिडीया असोसिएशन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडीया हे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
चांदा ब्लास्ट चे उपसंपादक आशिष रैच मार्गदर्शन करतांना म्हणाले की, डिजीटल मिडीयामध्ये काम करतांना आलेली बातमी जशीच्या तशी न प्रकाशित करता त्यामध्ये बदल करून, फेरफार करून प्रकाशीत केल्याच वाचकांवर वेगळा प्रभाव पडतो, डिजीटल युग असल्याने बदलत्या तंत्रज्ञानाने नवनवीन क्रांती घडून आल्याने कॉपी पेस्ट केलेल्या बातम्या मोठया प्रमाणात पहावयास मिळतात त्यामुळे वाचकांचाही डिजीटल मिडीयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलेले त्यामुळे बातमी उशीर प्रकाशित झाली तरी चालेल परंतु बातमीचा सारांश, मथळा, आदी वाचकांवर वचक निर्माण होईल असे असेल तर नक्कीच चॅनलकडे पाहण्याचा वाचकांना दृष्टीकोण बदलेले व वाचक तुमच्या बातमीची वाट पाहत बसेल. तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रा. सरफराज सर यांनी सुध्दा कार्यक्रमाचे कौतुक करत पत्रकार दिनाचे महत्व सांगितले.
सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र मत २४ तास न्यूज पोर्टल चे संपादक खोमदेव तुम्मेवार यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून उपस्थ्ति मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक कार्यात योगदाना बद्दल खरे वृत्तांत न्यूज पोर्टल संपादक मोरश्वर उद्योजवार, पत्रकारिता क्षेतात्र उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे व लोकवृत्त न्यूज चे संपादक निलेश सातपुते यांचा सुध्दा मान्यवरांच्या हस्ते सन्माचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डिजीटल मिडीयात कार्यरत असलेले संपादक, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गडविश्व चे संपादक सचिन जिवतोडे यांनी तर आभार लोकवृत्त न्यूज चे संपादक निलेश सातपुते यांनी केले.







0 Comments