म.रा.म.पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन व दिनदर्शिका लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा
ब्रह्मपुरी ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा, ब्रह्मपुरीच्या वतीने 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दिनदर्शिका लोकार्पण सोहळा शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पार पडला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तहसीलदार श्रीमती उषा चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर,ज्येष्ठ पत्रकार विजय मुळे, म.रा.म.पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केल्यानंतर सन 2023 या वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.उपस्थित पाहूण्यांनी पञकारितेचा इतिहास कथन करुन आजच्या पञकारितेबद्दल चिंतन मांडले.
म.रा.म.पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ.रवी रणदिवे,सचिव नंदू गुद्देवार,प्रा.शिवराज मालवी,प्रा.संजय लांबे, ज्येष्ठ पत्रकार जीवन बागडे,प्रशांत डांगे,महेश पिलारे,प्रशांत राऊत,अमरदीप लोखंडे,चंद्रशेखर सातव,मधुकर मेश्राम,तुलेश्वरी बालपांडे आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुलेश्वरी बालपांडे यांनी केले तर डॉ.धनराज खानोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.






0 Comments