भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात सर्वांच्या सहकार्यातून भाजपाला चंद्रपूर लोकसभेत पुनर्वैभव मिळवून देवू भाजपाच्या विजयी संकल्पसभेत हंसराज अहीर यांचे प्रतिपादन



भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात सर्वांच्या सहकार्यातून भाजपाला चंद्रपूर लोकसभेत पुनर्वैभव मिळवून देवू भाजपाच्या विजयी संकल्पसभेत हंसराज अहीर यांचे प्रतिपादन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडलेल्या विजय संकल्प सभेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उपस्थित जनसमुदयाला संबोधित केले.

दि. 02 जानेवारी 2023 रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहासमोरील न्यु इंग्लीश हायस्कूलच्या पटांगणात पार पडलेल्या विजयी संकल्प सभेत बोलतांना हंसराज अहीर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत ते म्हणाले की, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले मात्र मा. नड्डा जी केंद्रीय आरोग्यमंत्री असतांना त्यांनी या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता प्रदान केली होती. याबरोबरच हिमोग्लोबिनोपॅथी ( सिकलसेल ) रिसर्च सेंटरच्या उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध केल्याने प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते भूमीपूजन व नुकतेच या केंद्राचे लोकार्पण झाले. त्याबद्दल मा. नड्डाजींना धन्यवाद दिले.

आपल्या भाषणात हंसराज अहीर यांनी चंद्रपूरच्या गोंडकालीन सत्तेचा तसेच येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा आदर्श असलेल्या व माता महाकालीच्या नगरीत लोकसभा क्षेत्रातून तब्बल चार वेळा विजयश्री मिळाली. हे यश या क्षेत्रातील महान लोकांच्या आशिर्वादाने लाभल्याने त्यांचा सदैव ऋणी राहील. भाजपाच्या झंझावातात विरोधकांचा सफाया झाल्याने या क्षेत्रामध्ये कॉंग्रेसचा एकही आमदार नसतांना चंद्रपूर लोकसभेत आलेले अपयश हे दुर्दैवी असून या अपयशामुळे आपणांस या क्षेत्रात यावे लागले हे आमच्यासाठी सौभाग्य असून आपल्या नेतृत्वात भाजपाला पुन्हा पूर्नर्वैभव मिळवून देण्यासाठी तसेच पक्ष मजबुतीसाठी एकत्रीत येवून आपले हात बळकट करु असा संकल्प केला.

ते पुढे म्हणाले की पक्ष नेतृत्वाने लोकसभेत 4 वेळा प्रतिनिधित्व केल्याने दखल घेत मला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली याबद्दल मा. प्रधानमंत्री व पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो. माझेवर सोपविलेल्या या गरीमामय पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. मला विश्वास आहे या क्षेत्रातील जनता भाजपाच्या पूर्ववैभवात निश्चितपणे भर घालील व पक्षाला भरभरुन आशिर्वाद देईल.



Post a Comment

0 Comments